Home > News Update > शिक्षक बेमुदत संपावर, शिक्षण व्यवस्था वाऱ्यावर

शिक्षक बेमुदत संपावर, शिक्षण व्यवस्था वाऱ्यावर

राज्यातील 78 महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी 15 दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. मात्र याकडे सरकारचे लक्ष नाही.

शिक्षक बेमुदत संपावर, शिक्षण व्यवस्था वाऱ्यावर
X

महाराष्ट्रातील जवळपास ७८ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. मात्र यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला आणि यांची साधी चौकशी करायला प्रशासनाचा साधा अधिकारी सुद्धा आझाद मैदानात दाखल झालेला नाही, याला शिंदे-फडणवीस सरकारचा बेजबाबदार पणा म्हणाचा की अजून काही, असं शिक्षकांनी म्हटले आहे.

मुंबई येथील आझाद मैदानात गेल्या २ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील ७८ महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचारी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र राज्य कृती समितीचे बी.डी. अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाने कायम विना अनुदान धोरण स्वीकारण्यापूर्वी म्हणजे २४ नोव्हेंबर २००१ पुर्वीचे आमचे महाविद्यालय मान्यता प्राप्त आहे. परंतु शासनाने दिशाभूल करून वरील ७८ महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान अद्यापही दिलेले नाही. ७८ महाविद्यालयातील दीडशे पेक्षा अधिक कर्मचारी आझाद मैदानात दाखल झाले आहेत आणि गेल्या १५ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. पण याची साधी दखल घेण्यासाठी या विभागाचा एकही अधिकारी आझाद मैदानाकडे फिरकलेला नाही, असं शिक्षकांनी म्हटले आहे.

४ फेब्रुवारी २०२३ पुर्वी जर राज्य सरकारने राज्यातील ७८ महाविद्यालयाच्या अनुदानाचा निर्णय घेतला. तर ६ फेब्रुवारी पासुन आझाद मैदान येथे बसण्याची वेळ येणार नसल्याचे मुंडे यांनी इशारा दिला होता. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नसल्यामुळे महाराष्ट्रातील ७८ महाविद्यालयातील जवळपास १५ प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. महाराष्ट्र शासनाला गेल्या अनेक वर्षापासून या ७८ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विनंती केली होती. मात्र गेल्या २२ वर्षापासुन सातत्याने हा अन्याय सुरु असल्याचे मुंडे यांनी सांगितले. कायम विनाअनुदानाचे धोरण आम्हाला लागु होत नाही. तरी देखील महाराष्ट्र शासनाने आमच्यावर अन्याय सुरु ठेवलेला आहे, असं मत मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारच्या उदासीन धोरणामुळेच हे धरणे आंदोलन करावे लागत आहे, असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला. अनेक सहकारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आले आहेत. आमच्या ७८ महाविद्यालय कायम धोरण लागू करण्यापुर्वीचे असल्यामुळे अनुदान हा आमचा हक्क असल्याचे प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी सांगितले. ७८ महाविद्यालयाला १०० टक्के अनुदान महाराष्ट्र शासनाने सुरु करावे आणिआम्ही १०० टक्के अनुदानास पात्र असुनही शासनाने आमची दिशाभुल करुन आम्हाला अनुदानापासून वंचीत ठेवले असल्याचा आरोप यावेळी प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे. म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने आमच्या मागण्याची दखल घ्यावी, अशी विनंती मुंडे यांनी राज्य सरकारला केली आहे.

Updated : 6 Feb 2023 4:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top