Top
Home > Max Political > स्वाती मालीवाल यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल  

स्वाती मालीवाल यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल  

स्वाती मालीवाल यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल  
X

देशात वाढते बलात्काराचे प्रमाण आणि त्यानंतर आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहीजे, म्हणून निर्दशनं आणि आंदोलनं पाहायला मिळतात. मग निर्भया असो किंवा कोपर्डी आणि आता हैदराबाद पंरंतू एवढं सारं केल्यानंतर देखील या लोकांना न्याय मिळताना दिसत नाही, ही मोठी खंत आहे. बलात्कार करणाऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहीजे या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपोषणाला बसल्यापासून त्यांचे ८ किलो वजन कमी झाले आहे. शनिवारीच त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांची तब्बेत अधिक खालवल्यामुळे त्यांना उठून उभे राहणे देखील शक्य होत नाहीये. बलात्कार करणाऱ्यांना ६ महिन्याच्या आता फासावर लटकावले पाहीजे, अशी मालीवाल यांची मागणी आहे.

Updated : 15 Dec 2019 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top