Home > News Update > सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं नेमकं कारण काय?

सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं नेमकं कारण काय?

सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं नेमकं कारण काय?
X

अभिनेता सुशांत सिंह याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, असा आरोप सुशांत सिंहच्या मामांनी केला आहे. तसंच पोलिसांनी याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान सुशांत सिंहने आत्महत्या केलेली नाही तर यामागे मोठा कट असल्याचा आरोप बिहारमधील जनअधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी केला आहे. तसंच सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. " सुशांत सि़ंंहचे कामावर प्रेम होते आणि तो सतत कामात असायचा, तो आत्महत्या करणे शक्य नाही, त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणी CBI चौकशी करावी"

अशी मागणी पप्पू यादव यांनी केली आहे. सुशांत सिंहची हत्या झाल्याची शक्यता असू शकते, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. सुशांत सिंह याचा रविवारी आपल्या वांद्रे इथल्या घरात मृतदेह आढळला होता.

काय आहे पोस्टमार्टम रिपोर्ट?

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळफास घेऊन मृत्यू झालाचं सांगण्यात आलं आहे. त्यांचे पोस्टमॉर्टम मुंबईच्या जुहू येथील कूपर रुग्णालयात झाले. तसेच त्याच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव जे.जे. रुग्णालये पाठविण्यात आले आहेत. या अवयवांची तपासणी केल्यावर हे स्पष्ट होईल की, त्याच्या शरीरात विष होतं की नाही.

Updated : 15 Jun 2020 6:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top