News Update
Home > Election 2020 > मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचं आश्चर्य – शरद पवार

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचं आश्चर्य – शरद पवार

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचं आश्चर्य – शरद पवार
X

एनआरसी बाबत असलेली नाराजी मी समजू शकतो परंतु तुमचं आंदोलन शांततेत करा... देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नका आणि कायदा हातात घेऊ नका असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला केलं आहे. आज त्यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या घरी पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान यांनी दिल्लीतील एका सभेत मंत्रिमंडळ व संसदेत एनआरसीबाबत विरोध झाला नाही असं सांगितलं. हे चुकीचे आहे. संसदेत मी आणि आमचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एनआरसीबाबतचे दुष्परिणाम सांगितले होते. शिवाय राष्ट्रपती महोदयांनी दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्यावेळी एनआरसी विषय सांगितला होता. राष्ट्रपती बोलतात ती सरकारची पॉलिसी ठरलेली असते तेच बोललं जातं. देशाचे गृहमंत्री एनआरसीचा निर्णय देशासाठी घेतल्याचे सभागृहात सांगतात आणि दुसरीकडे पंतप्रधान वेगळे बोलतात यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा...

Jharkhand election result : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

उद्या मंत्रीमंडळ विस्तार? मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांची नावं चर्चेत

Jharkhand election result: : एका वर्षात भाजपच्या हातून ५ राज्य गेली?

सत्तेत बसलेल्या लोकांनी शांततेने पाऊलं टाकायची असतात. परंतु सध्याचे सरकार ज्या पध्दतीने धार्मिक अंतर ठेवण्याचा आणि एकतेला ठेच पोहोचेल अशी पाऊलं टाकताना दिसत आहे असा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान सर्वपक्षीय बैठका घेत राष्ट्रीय विषयांवर यापूर्वी चर्चा होत होती. आता ते होत नाही. याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

एनआरसी विरोधात देशातील एक मोठा हिस्सा रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करत आहे. परंतु हे आंदोलन शांततेत करा असे आवाहन देखील शरद पवार यांनी यावेळी केले आहे. येत्या दोन वर्षांत भाजपला उतरती कळा लागली असून ती थांबताना दिसत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Updated : 23 Dec 2019 12:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top