VIDEO: सुरेश धस यांच्यावर का होतायेत गुन्हे दाखल?

भाजपा आमदार धस यांच्याविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाबंदीचा आदेश डावलून ऊसतोड मजुरांना मदत केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा झाला होता.

आता, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी गावात एकाच कुटुंबात ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानं जिल्हा प्रशासनाने तात्काळ या भागातील ५ गावं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. या गावात संचारबंदी लागू केली आहे.

या गावात संचारबंदी लागू असताना आमदार सुरेस धस यांनी प्रवेश केल्यानं त्यांच्याविरोधात कलम १८८, २६९, २७० राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ ब अन्वये गुन्हा नोंदण्यात आला आहे.

यापूर्वी देखील ऊसतोड मजुरांच्या मदतीला गेले म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं सुरेश धस यांच्यावर वारंवार गुन्हे का दाखल होत आहेत? असा सवाल मॅक्समहाराष्ट्राचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी धस यांना विचारला असता काय म्हणाले सुरेश धस पाहा