Home > News Update > अकरावीच्या अंतिम फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे रांगेत हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष

अकरावीच्या अंतिम फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे रांगेत हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष

अकरावीच्या अंतिम फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे रांगेत हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष
X

अकरावीच्या अंतिम फेरीसाठी चर्नीरोड येथील उपसंचालक कार्यालयात विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी केली होती. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाच-सहा तास रांग पुढे सरकत नसल्याने उपाशीपोटी आलेल्या विद्यार्थ्यांनाचे चांगलेच हाल झाले.

शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या कार्यालयातून उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण यावर त्यांनी बाहेर लक्ष देण्यापेक्षा सुनावणी करिता आलेल्या शिक्षण संस्था चालकांकडे "अधिक" लक्ष केंद्रित केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी दिसली.

एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज पासून दि. १५ ते १७ ऑक्टोबर २०१९ या दरम्यान अंतिम ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे चर्नीरोड येथील उपसंचालक कार्यालयात सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी रांगा लागल्या आहेत.

सकाळीं साडेदहा वाजता रांग हळू हळू पुढे सरकू लागली. परंतु नंतर रांग चार ते पाच तास उशिरा पुढे सरकत होत्या. याबाबत मागील रांगेत असलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत आलेल्या पालकांनी भरपूर आरडाओरड सुरू केला. पण ढिम्म प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शेवटी शेवटी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ येते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. काही विद्यार्थी रांगेमध्ये घुसून लोकांना दमदाटी करीत होते. त्यामुळे काही काळ तेथे बाचाबाची झाली. म्हणूनच रांगेला पुढे जायला उशीर झालेला होता.

याबाबत शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांच्या कार्यालयातून उपसंचालक राजेंद्र अहिरे यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. असे समजते.

परंतु अहिरे हे दुपारी बारा वाजता कार्यालयात आले. अन् लगेच शिक्षण संस्थाचालकांच्या विशेष "लक्ष " केंद्रित करून सुनावण्या सुरूच ठेवल्या. मात्र, सकाळी रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले होते.

अशा या नियोजन शून्य कारभारामुळे आज आलेल्या पालक वर्गात मात्र चांगलीच संतापाची लाट पसरली होती.

Updated : 15 Oct 2019 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top