Home > News Update > हॅाटस्पॅाट क्षेत्रात होणार नियमांची क़डक अंमलबजावणी...

हॅाटस्पॅाट क्षेत्रात होणार नियमांची क़डक अंमलबजावणी...

हॅाटस्पॅाट क्षेत्रात होणार नियमांची क़डक अंमलबजावणी...
X

ठाणे: कॅान्टॅक्ट ट्रेसींग वाढविणे, डिस्चार्जचे प्रमाण वाढविणे आणि मृत्यू दर कमी करणे यासाठी जे काही करता येईल ते कठोरपणे करा. शहरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोवीड 19 बाधित रूग्णांची संख्या आहे ती ठिकाणे कोवीड हॅाटस्पॅाट म्हणून जाहिर करून त्याची कठोर अंमलजावणी करा.

कोरोना कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. असे स्पष्ट करीत याबाबतीत कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका असे स्पष्ट आदेश राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनास दिले. यावेळी खासदार राजन विचारेही उपस्थित होते.

नुतन महापालिका आयुक्त रूजू झाल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीच्या सुरूवातीलाच शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे कॅानॅक्ट ट्रेसींग वाढविणे आणि त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविणे यावर प्रामुख्याने भर द्या अशा सूचना केल्या. मोठ्या प्रमाणात कॅानॅक्ट ट्रेसींग करून त्यांना क्वारंटाईन केल्याशिवाय ही साखळी तोडता येणार नाही असे स्पष्ट करून कोरोना बाधित रूग्णांचा डिस्चार्जचे प्रमाण वाढविण्याबरोबरच मृत्यूचा दरही कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करा असेही सांगितले.

शहरामध्ये ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे ती ठिकाणे हॅाटस्पॅाट म्हणून जाहिर करा. लोकांना त्याची माहिती द्या आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या साहाय्याने कडक अंमलबजाणी करा. कोणतीही व्यक्ती त्या हॅाटस्पॅाटच्या परिसरामध्ये येणार नाही आणि आतील व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्या. याबाबत नागरिकांना जाहिरपणे सूचना द्या असे त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर ॲाक्सीजन बेडची संख्या वाढविण्याची गरज असून कोरोना कोवीड 19 रूग्ण व्हेंटीलेटरवर जाण्याची वाट पाहू नका. माझ्या दृष्टीने माणसाचा जीव महत्वाचा असून ती वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. यामध्ये हयगय केल्यास कोणालाही माफ केले जाणार नाही असेही यांनी बजावले.

या बैठकीदरम्यान शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना कोरोना कोवीड 19 नियंत्रणासाठी जे जे करता येईल ते करा. निधीची कमतरता पडू देणार नाही. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले.

चाचण्याचे अहवाल थेट महापालिकेकडे मागवा

कोरोना कोवीड चाचण्याचा अहवाल संबंधित लॅब ही थेट रूग्णांच्या हातात देते त्यामुळे त्यांच्यामनामध्ये भीती निर्माण होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी चाचण्यांचे अहवाल थेट महापालिकेकडे मागवा आणि त्यानंतर त्या रूग्णांना महापालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून संपर्क साधा असे यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जी लॅब चाचणी अहवाल थेट महापालिकेकडे देणार नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करा असेही त्यांनी स्पष्ट केले.

Updated : 27 Jun 2020 9:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top