Home > News Update > बलात्कार पीडिता मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार – बाळासाहेब थोरात

बलात्कार पीडिता मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार – बाळासाहेब थोरात

बलात्कार पीडिता मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार – बाळासाहेब थोरात
X

बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना अहमदनगरमध्ये घडली. या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या कामकाजात पडसाद उमटले

याविषयी राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी बातचित केली. त्यावेळी संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलंय.

या प्रकरणाला काहीतरी पार्श्वभूमी आहे. मात्र, घडलेली घटना ही दुर्दैवी आहे हे नाकारता येणार नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. पोलीस अधिक्षकांना त्यासंबंधीच्या सूचना केलेल्या आहेत. लवकरच त्यांच्याकडून अहवाल येईल. ज्या पोलिसांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत त्यांच्यावर तपास करून गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल असं आश्वासन थोरात यांनी दिलं.

राज्यातल्या वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मागचं सरकार, आताचं सरकार असा भेद करणं चुकीचं ठरेल. अशा घटना थांबाव्यात यासाठी आणखी कडक कायदे निर्माण करून धाक निर्माण करण्याचं काम राज्य सरकार करत आहे.

Updated : 3 March 2020 4:22 AM GMT
Next Story
Share it
Top