Home > News Update > फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा

फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा
X

महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील ऑनलाइन निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील समष्टी फाउंडेशन आणि दशमी क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या निबंधास ३,०००, दुसऱ्या क्रमांकास २,००० आणि तिसऱ्या क्रमांकास १,००० रुपयांचं रोख बक्षीस आहे. या स्पर्धेत विजेते ठरलेल्या आणि काही निवडक निबंधांना 'मॅक्स महाराष्ट्र.कॉम' प्रसिध्दी दिली जाणार आहे.

निबंधाचे विषय :

1. सावित्रीजोति आणि उद्योजकता

2. मी वाचलेलं आंबेडकरी साहित्य

3. राष्ट्रविकासाचं फुले-आंबेडकरी मॉडेल

4. फुले-आंबेडकरी तत्वज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

5. साथीचे आजार आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना

शब्दमर्यादा – फक्त 2000 शब्द

अंतिम तारिख - 12 एप्रिल 2020

या ईमेलवर पाठवावेत आपले निबंध

[email protected]

वय, भाषा कोणतीही अट नाही.

Updated : 6 April 2020 11:48 PM GMT
Next Story
Share it
Top