Home > News Update > कोरेगाव-भीमा : SIT मार्फत समांतर तपास

कोरेगाव-भीमा : SIT मार्फत समांतर तपास

कोरेगाव-भीमा : SIT मार्फत समांतर तपास
X

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएमार्फत ताब्यात घेतल्यानंतर आता राज्य सरकारने एसआयटी नेमून स्वतंत्रपणे तपास करण्याचा निर्णय घेतलाय. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख याची अधिकृत घोषणा करतील अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

कोरेगाव- भीमा हिंसाचारप्रकरणी एनआयएकडे तपास सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यामुळे शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणाचा तपास एसआयटी नेमून केला जावा अशी मागणी स्वत: पवार यांनी केली होती. आता या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा समांतर तपास राज्य सरकार एसआयटी असल्याचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सांगितले आहे.

Updated : 17 Feb 2020 11:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top