Home > News Update > Maharashtra Lockdown: जनतेला अन्न पुरवठा करा, भुजबळांची पंतप्रधानांकडे मागणी

Maharashtra Lockdown: जनतेला अन्न पुरवठा करा, भुजबळांची पंतप्रधानांकडे मागणी

Maharashtra Lockdown: जनतेला अन्न पुरवठा करा, भुजबळांची पंतप्रधानांकडे मागणी Start Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana in Maharashtra chagan bhujabal demand to pm narendra modi

Maharashtra Lockdown: जनतेला अन्न पुरवठा करा, भुजबळांची पंतप्रधानांकडे मागणी
X

महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव आणण्यासाठी राज्य सरकारने 14 एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्याची मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.....

या पत्रामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी लिहीले आहे की, महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा आलेख हा वाढता आहे. महाराष्ट्रात दररोज सरासरी ६० हजाराच्या आसपास कोरोना रूग्न सापडत आहेत आणि त्या करिता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लागू केला आहेत. त्यामुळे राज्यातील गरीब आणि सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच हे कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महाराष्ट्राला पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात भुजबळ यांनी मागच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारने केंद्राची ही योजना यशस्वीपणे राबविल्याचा उल्लेख देखील केला आहे. एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत सूरू असलेल्या या योजनेचा लाभ सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य सरकारने देखील प्रयत्न केले होते... त्याचप्रमाणे मे २०२० मध्ये केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत घोषित केल्या प्रमाणे मे २०२० आणि जून २०२० मध्ये देखील राज्यसरकारने तांदूळ आणि चणाडाळ हा महाराष्ट्रातील ४२ लाख ३० हजार ७३५ रेशनकार्ड नसलेल्या लाभार्थ्यांना वितरीत केला असल्याची माहिती देखील मंत्री भुजबळ यांनी दिली......

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या 1.40 लाख मेट्रिक टन तांदळाची तर 2.40 लाख मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या ६ करोड ४७ लाख लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोहचवू शकतो. आणि त्याचबरोबर १.५१ करोड कार्डधारक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी १५,१०० मेट्रिक टन तुरडाळीची गरज असल्याची माहीत देखील या पत्रात छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून राज्याला पुढील ६ महिन्यासाठी २५ लाख मेट्रिक टन म्हणजेच प्रत्येक महिन्याला ४ लाख मेट्रिक टन धान्य उपलब्ध करून देण्याची विनंती छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

Updated : 13 April 2021 4:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top