Home > News Update > मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारची आज अग्निपरीक्षा

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारची आज अग्निपरीक्षा

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकारची आज अग्निपरीक्षा
X

काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अखेर आज मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची परीक्षा आहे. काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीची मागणी केली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या २२ आमदारांनीही राजीनामा दिला असल्याने कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात आल्याने बहुमत चाचणी घेण्याची मागणी शिवराज सिंह चौहान यांनी केली होती.

शिवराज सिंह चौहान यांच्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टानं २० मार्च म्हणजेच आज संध्याकाळी पाच वाजपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान कमलनाथ यांच्याकडे बहुमत नसल्याने त्यांचे सरकार पडणारच असा दावा शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मध्य प्रदेशात विधानसभेत एकूण सध्या २२२ जागा आहेत. यात काँग्रेस ९२, बंडखोर काँग्रेस आमदार – १६, भाजप – १०७, अपक्ष -४, सपा – १ आणि बसपाकडे २ जागा आहेत. काँग्रेसचे ते १६ बंडखोर आमदार जर आज सभागृहात उपस्थित राहिले तर काँग्रेसची आमदारांची संख्या १०८वरुन ९२ वर येईल किंवा ते आमदार अनुपस्थित राहिले तरी सभागृहातील सदस्य संख्या २०६ असेल आणि बहुमतासाठीचा आकडा १०४ असल्याने कमलनाथ सरकारच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.

Updated : 20 March 2020 3:23 AM GMT
Next Story
Share it
Top