Home > News Update > सोनिया गांधी यांनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!

सोनिया गांधी यांनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!

सोनिया गांधी यांनी बोलावली विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित!
X

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे.

केंद्र सरकारने नुकतंच 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजमध्ये गरिबांना कोणतीही मदत करण्यात आली नसल्याचा आरोप कॉंग्रेस ने केला आहे. तसंच जगातील अनेक शास्त्रज्ञांनी गरिबांना थेट मदत करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र. सरकारने कर्जच जास्त देऊ केलं असल्याचं पॅकेज वरुन दिसून येत आहे. त्यामुळं कोरोना च्या या लढाईत गरिबांचे मोठे हाल होत आहेत. असं तज्ञांचं मत आहे.

सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला १७ पक्ष सहभागी होणार असून सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(uddhav Thackeray) खासदार संजय राऊत तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, (sharad pawar) अजित पवार उपस्थित राहणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ही बैठक व्हिडीओ कॉन्फर्नस द्वारे होत आहे. या बैठकीत शेतकरी, कामगार कायद्यात केलेला बदल यावर चर्चा होणार आहे.

Updated : 20 May 2020 6:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top