Home > News Update > डिसेंबरपूर्वी राज्यात सेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार – संजय राऊत

डिसेंबरपूर्वी राज्यात सेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार – संजय राऊत

डिसेंबरपूर्वी राज्यात सेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार – संजय राऊत
X

उद्या दुपारपर्यंत सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं सूचक विधान शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केलं आहे. आज सकाळी दिल्लीमध्ये त्यांची पत्रकार परिषद (press conference) पार पडली. सेनेच्या नेतृत्वात येत्या ५-६ दिवसांत सरकार स्थापन होईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा...

पीएमसी बँकेच्या खातेदाऱ्यांना एकनाथ गायकवाड यांनी दिला दिलासा..

‘ही मदत म्हणजे शेतकरी बापाच्या मयतीला केलेला आहेर आहे’ – अजित नवले

ओला दुष्काळ : चारा नसल्यानं जनावरं विक्रीला

आज दिल्लीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक आहे. या बैठकीनंतर चर्चांना पूर्णविराम मिळेल असंही राऊत म्हणाले. डिसेंबरपूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल असंही त्यांनी सांगितलं.

पारंपारिक समीकरणांना छेद देत राज्यात नव्या राजकीय आघाडीला आकार येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे सरकार स्थापनेसंबंधी घोषणा करण्यास विलंब होत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे दिल्ली आणि राज्यातली सर्व राजकीय परिस्थिती पाहून पुढच्या गोष्टी घडणार आहेत.

Updated : 20 Nov 2019 4:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top