Home > News Update > कोरोना लॉकडाऊन: सामनातून मोदींवर टीका

कोरोना लॉकडाऊन: सामनातून मोदींवर टीका

कोरोना लॉकडाऊन: सामनातून मोदींवर टीका
X

एकीकडे सगळं बंद करा असं सांगताना दिल्लीतली संसंद का सुरू ठेवलीय. मोदींनी केवळ राजकारणासाठी संसंद सुरू ठेवली आहे, जेणेकरून संसंद बंद केली तर त्या आधारावर कमलनाथ यांना फायदा होऊ नये. कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर फालतू लोकशाहीवादी न राहता कडक उपाय योजले पाहीजेत असं मत सामनातून व्यक्त करण्यात आलंय.

चीनमधील वुहानची लोकसंख्या मुंबई-दिल्लीइतकीच म्हणजे साधारण दीड कोटी आहे. 23 जानेवारीपासून तेथील लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीत जगावे लागले. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 44 पर्यंत पोहोचली. 14 वरून हा आकडा 49 वर पोहोचला. लोक स्वयंशिस्त पाळायला तयार नाहीत. वुहान शहर हा कोरोना व्हायरसचा ‘गड’ होता. तो गड सध्या साफ ढासळला आहे. अर्थात त्यासाठी तेथील सरकारने दोन महिने हा गड ‘लॉकडाऊन’ केला, लोकांनी प्रचंड त्रास सोसला. आपल्या लोकांनी रस्त्यावर थुंकणे बंद केले तरी कोरोना व्हायरसच्या निम्म्या केसेस कमी होतील.

रोना रोखायचा असेल तर मुंबई संपूर्ण ‘लॉकडाऊन’ म्हणजे बंद करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या दिशेने पावले टाकीत आहेत. मुंबईतील पन्नास टक्के दुकाने बंद राहतील. काही भाग एक दिवसाआड बंद करण्याचे ठरवले आहे. गर्दी टाळावी व विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी हे उपाय योजले आहेत. जितके कठोर उपाय योजले जातील व त्याचे पालन लोकांकडून होईल त्या वेगाने कोरोना व्हायरस रोखला जाईल. याबाबत चीनमधील वुहान शहराचे उदाहरण सगळय़ांनी डोळय़ांसमोर ठेवले पाहिजे. वुहान शहर संपूर्ण ‘लॉकडाऊन’ केले गेले. तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली. बसेस, रेल्वे, मेट्रो सगळे बंद केले. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी कठोर उपाय योजले. परिणाम असा झाला की, वुहान शहरात सलग दुसऱया दिवशी म्हणजे मंगळवार आणि बुधवारी फक्त एकाच रुग्णाची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ निघाली. चीन सरकारच्या कठोर म्हणा किंवा निर्घृण धोरणामुळे कोरोना पॉझिटिव्हचा कहर झपाटय़ाने खाली उतरला आहे. चीनमध्ये एका वुहान शहरात कोरोना व्हायरसने चार हजारांवर बळी घेतले. आता चीनमधून ‘कोरोना’ हद्दपार होताना दिसत आहे. चीनची राजवट थोडी हुकूमशाही पद्धतीची आहे. आम्ही फालतू लोकशाहीवादी आहोत. त्या फालतूपणाचे जे परिणाम भोगावे लागतात ते आपण याप्रसंगी भोगत आहोत. दिल्लीत कोणीही गर्दी करू नये, एकमेकांत मिसळू नये, असे आवाहन स्वतः पंतप्रधान एका बाजूला करतात, पण त्याच वेळी देशाची संसद राजकीय कारणांसाठी चालू ठेवतात. हजारांवर खासदार, तेवढेच अधिकारी, कर्मचारी येथे एकत्र येतात. एका बाजूला सरकारी कामकाज धिमे किंवा बंद ठेवायचे व दुसऱया बाजूला

संसदेचे काम हट्टाने

चालू ठेवायचे. हे काही लोकशाहीची महान परंपरा वगैरे राखण्यासाठी नक्कीच नाही. मध्य प्रदेशात सरकार पाडापाडीचा जो खेळ सुरू केला त्यास ‘आधार’ म्हणून संसदेचे अधिवेशन सुरू ठेवले आहे. मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करायचे आहे, पण ‘कोरोना’मुळे अधिवेशन कसे घ्यायचे? असा राजकीय आरोग्यविषयक सवाल कमलनाथवाद्यांनी उपस्थित केला. आता संसदेचे अधिवेशन ‘कोरोना’मुळे गुंडाळले तर कमलनाथांच्या भूमिकेस बळकटी मिळेल. त्यामुळे दिल्लीत कोरोनाबाबत कितीही आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तरी संसद चालू ठेवणे राजकीयदृष्टय़ा गरजेचे झाले आहे, असे ‘दिल्ली की गलियारों में’ बोलले जात आहे. खरे-खोटे वरच्यांनाच माहीत, पण दिल्लीच काय, देशभरात कठोर उपाय योजावेच लागतील. आपल्याकडे ‘क्वारंटाइन’ची गरज असलेले लोक पळ काढत आहेत. सरळ प्रवास करीत आहेत. एकमेकांना विषाणूचा संसर्ग होईल असे वागत आहेत. अशाने संकट वाढेल व हाहाकार उडेल. चीनमधील वुहान शहर आणि हुवेई प्रांत 23 जानेवारीपासून ‘लॉकडाऊन’ आहेत. आता परिस्थिती सुधारल्यावर सरकारने तेथील उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली. सगळय़ात जास्त कोरोनाचा धुमाकूळ ज्या ‘वुहान’मध्ये राहिला तेथे गेल्या दोन दिवसांत फक्त एकच केस पॉझिटिव्ह निघाली, हे चित्र आशादायी आहे. वुहान, हुवेई अंशतः लॉकडाऊन केले असते तर हा परिणाम दिसला नसता. याआधी फेब्रुवारी महिन्यात हुवेई प्रांतात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ टोकावर पोहोचला होता तेव्हा एका दिवसात हजारो लोकांची चाचणी पॉझिटिव्ह होत असे. आता हा आकडा एक वर सरला.

वुहानची लोकसंख्या मुंबई-दिल्लीइतकीच म्हणजे साधारण दीड कोटी आहे. 23 जानेवारीपासून तेथील लोकांना अत्यंत कठीण परिस्थितीत जगावे लागले. लोकांनी हा ‘क्वारंटाइन’चा त्रास सहन केला व हासुद्धा राष्ट्रवादच आहे. फक्त ‘जय हिंद, वंदे मातरम्, भारत माता की जय’ असे बोलण्यानेच राष्ट्रवाद जागा होतो असे नाही. सरकारी आदेश पाळणे व अशा प्रकारची महामारी वाढू नये यासाठी सहकार्य करणे हाही मोठा राष्ट्रवाद आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 44 पर्यंत पोहोचली. 14 वरून हा आकडा 49 वर पोहोचला. लोक स्वयंशिस्त पाळायला तयार नाहीत. खोकल्यातून, रस्त्यावर थुंकण्यातून कोरोना विषाणू पसरतो, पण आपण ऐकायला तयार नाही. रस्त्यावर थुंकणे सुरूच आहे व त्यावर शेवटी कायद्याने कारवाई करण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत संकट वाढले तर फक्त सरकारला कसे जबाबदार धरता येईल? चीनमध्ये रोज 25 हजार लोक बाहेरून येतात. चीनच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आणि शहरांमध्ये जे लोक बाहेरून येत आहेत त्यांना दयामाया न दाखवता ‘क्वारंटाइन’ला पाठवले जात आहे व त्यांच्या ‘क्वारंटाइन’मधून कोणी पलायन करीत नाही. चीनमध्ये कोरोनाचा ‘मारा’ कमी झाला आहे, पण कोरोना पुन्हा हल्ला करू शकतो, असे तेथील डॉक्टर सांगतात व त्यादृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. वुहान शहर हा कोरोना व्हायरसचा ‘गड’ होता. तो गड सध्या साफ ढासळला आहे. अर्थात त्यासाठी तेथील सरकारने दोन महिने हा गड ‘लॉकडाऊन’ केला, लोकांनी प्रचंड त्रास सोसला. आपल्या लोकांनी रस्त्यावर थुंकणे बंद केले तरी कोरोना व्हायरसच्या निम्म्या केसेस कमी होतील.

Updated : 20 March 2020 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top