Home > News Update > Saamana Editorial: भाजपने पक्षांतर्गत गोंधळ मिटवावा, सामनामधून चिमटे

Saamana Editorial: भाजपने पक्षांतर्गत गोंधळ मिटवावा, सामनामधून चिमटे

Shivsena mouthpiece criticizes BJP over Chandrakant patil’s offer to Shivsena for Yuti – भाजप शिवसेनेसोबत राज्यात सत्ता स्थापन करण्यास तयार आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या वक्तव्याचा शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून समाचार घेण्यात आला आहे.

Saamana Editorial: भाजपने पक्षांतर्गत गोंधळ मिटवावा, सामनामधून चिमटे
X

महाराष्ट्रासारख्या राज्यात मनासारखे राजकारण घडले नाही म्हणून राज्याच्या अस्तित्वावरच शिंतोडे उडवायचे हा उद्योग बरा नव्हे! नड्डा म्हणतात, ‘‘स्वबळावर सत्ता आणू. आक्रमक व्हा!’’ त्याच वेळी देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ तिकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर नड्डा यांना आडवे जाणारे एक बालिश वक्तव्य केले.

‘राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत.’ आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्री पद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरू आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये.

भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे खरा. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. श्री. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे!

हे ही वाचा..

Saamana Editorial: काही घरे विरोधकांसाठी सोडा, सामनामधून भाजपला टोला

Saamana Editorial: काँग्रेसच्या बचावासाठी शिवसेनेचा ‘सामना’

Saamana Editorial: वाईन, डाईन आणि फाईन… व्वा! राज बाबू!!

Updated : 29 July 2020 1:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top