संपूर्ण विरोधी पक्ष 24 तास राजभवनाच्या दारात उभा आहे: संजय राऊत

Coronavirus च्या या लढाईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद घटनात्मक पेचामध्ये डावावर लागलं आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

कोणत्याही व्यक्तीने मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्या मंत्र्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्य व्हावं लागतं. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचं सदस्य होणं गरजेचं आहे. मात्र, कोरोना व्हायरस चा देशात प्रकोप सुरु असल्यानं राज्यात कोणतीही निवडणूक होणार नाही. अशा परिस्थितीत राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

त्यामुळं महाविकास आघाडी ने राज्यपाल कोट्यातील रिक्त असलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे सरकारची निवड करण्यात यावी. असा ठराव मंत्रीमंडळाच्या बैठकीत पार केला आहे. त्यामुळं राज्यपाल कोणती भूमिका घेतात? याकडं सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. त्यातच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटी वाढल्या असल्याचं बोललं जात आहे. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी भाजप वर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राला विरोधी पक्षाची मोठी परंपरा आहे. राजशिष्टाचार पाळून आतापर्यंतच्या विरोधी पक्षांनी सरकारला सहकार्य केले आहे. पण आताचे विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेते रोज सकाळी उठून राज्यपालांच्या दारात जाऊन खडे फोडत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी संजय राऊत यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी संजय राऊत काय म्हणाले ते पाहूया….