Home > News Update > मी पुन्हा येईन… शिवसैनिकांची देवेंद्र फडणवीसांसमोर घोषणाबाजी

मी पुन्हा येईन… शिवसैनिकांची देवेंद्र फडणवीसांसमोर घोषणाबाजी

मी पुन्हा येईन… शिवसैनिकांची देवेंद्र फडणवीसांसमोर घोषणाबाजी
X

आज शिवसेनाप्रमुख (Shiv sena)दिवंगत बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) यांचा ७ वा स्मृतीदिन आहे. यानिमित्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर आल्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या अंदाजात त्यांचं स्वागत केलं. फडणवीस येताच शिवसैनिकांनी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन... अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. यासोबतच सरकार कोणाचं, शिवसेनेचं या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर असेपर्यंत शिवसैनिकांची ही घोषणाबाजी सुरूच होती.

आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन बाळासाहेबांना व्हिडीओच्या माध्यमातून अभिवादन करत शिवसेनेला टोला लगावला. त्याला प्रत्युत्तर देत त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांना आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही असं म्हटलंय.

Updated : 17 Nov 2019 11:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top