Home > News Update > हम बुरे ही ठीक है – संजय राऊत

हम बुरे ही ठीक है – संजय राऊत

हम बुरे ही ठीक है – संजय राऊत
X

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषद आणि ट्विटर अकाउंट वरुन भाजपवर केलेली सडकून टिका सतत चर्चेत असते. मागील अनेक दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्र सत्तास्थापनेची आस लावून बसलेला आहे. मात्र, अजूनही सत्तास्थापनेच चित्र स्पष्ट झालेलं नाही.

काल दिल्ली येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेची बैठक तब्बल ३ तास चालली. किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. या बैठकी नंतर पृथ्वीराज चव्हाण माध्यमांशी बोलतांना म्हणालेत लवकरच राज्यात एक स्थिर सरकार प्रस्थापित करु, पंरतु सत्ता स्थापनेच्या विंलबावरुन भाजप शिवसेनेचा चिमटा काढतांना दिसत आहे. त्यानंतर शिवसेना खासदार यांनी ट्विट करुन भाजपवर निशाणा साधलाय. ‘हम बुरे ही, ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था.’ असं ट्विट करुन संजय राऊत यांनी भाजपवर टिका केली. त्याचप्रमाणे महाशिवआघाडीचा मुख्यमंत्री होईल असं ही मत शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Updated : 21 Nov 2019 4:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top