शिवसेना खालच्या थराला जाईल वाटले नव्हते – देवेंद्र फडणवीस

शिवसेना आणि भाजप यांच्यात वादाचे भोवर अजून सुरुच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी युती तोडण्याच्या मुद्दयावरुन पुन्हा एकदा शिवसेनेला धारेवर धरलं आहे. जनतेने महायुतीला जनादार दिला आणि त्या जनादाराचा शिवसेनाने काडिमोड केल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी जरी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होता की, महाराष्ट्रात एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल मात्र, हा मुख्यमंत्री शिवसेनेच्या पाठिंब्यावर बनवू असा शब्द दिला होता का? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी राज्यात जे सत्ता नाट्य रंगले त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठींब्याने शिवसेनाने आपली सत्ता प्रस्थापीत केली. “शिवसेना एवढ्या खालच्या थराला जाईल असं कधी वाटले नव्हते” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.