Home > News Update > कर्जमाफी होणार का? काय म्हणाले शरद पवार

कर्जमाफी होणार का? काय म्हणाले शरद पवार

कर्जमाफी होणार का?  काय म्हणाले शरद पवार
X

एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यातच राज्यात सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी असलेले शरद पवार(shard pawar) सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी शरद पवार यांनी काल केली. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असल्याचं सांगितलं. यासाठी आपण केंद्रात सुरु होणाऱ्या अधिवेशना दरम्यान केंद्रीय कृषी मंत्र्यांची आणि त्यानंतर अर्थ मंत्र्यांशी बोलून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे त्या पिकावर असलेल्या कर्ज तो भरु शकत नाही. ते कर्जमाफ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तसंच पिकाचं नुकसान झालं असल्यामुळं शेतकऱ्यांना शून्य व्याज दराने अथवा कमी व्याज दरानं भांडवल उपलब्ध करुन देण्याची मागणी आपण करणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेच्या(shivsena) जाहीरनाम्यात कर्जमाफी संदर्भात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येणारं सरकार कर्जमाफी करेल का? यावर शरद पवार यांनी आघाडी मध्ये देखील हा मुद्दा होता. आता सध्या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरु आहेत. त्यांनी काय निर्णय घेतला हे पाहावं लागेल. किती एकरा पर्यंत कर्जमाफी करायची याचा विचार करावा लागेल. असं म्हणत पवारांनी कर्जमाफी बाबत सकारात्मक भूमिका घेतली.


Updated : 15 Nov 2019 6:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top