Home > Election 2020 > शरद पवारांचं ईव्हीएमबाबतचं सर्वात मोठं वक्तव्यं

शरद पवारांचं ईव्हीएमबाबतचं सर्वात मोठं वक्तव्यं

शरद पवारांचं ईव्हीएमबाबतचं सर्वात मोठं वक्तव्यं
X

ईव्हीएम मशीनबाबत विरोधकांनी अनेकदा आवाज उठवला होता. वेळोवेळी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनबाबत मोठं वक्तव्यं केलंय.

ईव्हीएम मशीनवरील घड्याळाचं बटन दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे, त्यामुळं मला ईव्हीएम मशीनबाबत चिंता वाटत असल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हैदराबाद आणि गुजरात या राज्यातील काही ईव्हीएम मशीन लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि मला बटण दाबण्यास सांगितलं. त्यावेळी मी ईव्हीएम मशीनमधील घड्याळासमोरचं बटण दाबलं आणि मत कमळाला गेलं, हा संपूर्ण प्रकार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला, असं शरद पवारांनी सांगितलं. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वच ईव्हीएम मशीनमध्ये असा प्रकार घडला असेल असं आपलं मत नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

ईव्हीएमबाबतच्या आमच्या तक्रारी आम्ही न्यायालयासमोरही मांडल्या, दुर्देवानं आमचं म्हणणं न्यायालयानंही ऐकून घेतलं नाही, अशी खंत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.

Updated : 9 May 2019 10:49 AM GMT
Next Story
Share it
Top