Home > News Update > सत्य बाहेर येईल या भीतीने एनआयएकडे तपास : शरद पवार

सत्य बाहेर येईल या भीतीने एनआयएकडे तपास : शरद पवार

सत्य बाहेर येईल या भीतीने एनआयएकडे तपास : शरद पवार
X

कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) प्रकरणाचा तपासात केंद्र सरकारने हस्तक्षेप करत हा तपास एनआयकडे वळवल्यानंतर या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशीच्या मागणीनंतर पाच तासात केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेतला, एल्गार परिषदेसंदर्भातील खोटे खटले दाखल केले असं म्हणत अधिकाऱ्यांनी गैरमार्गाने खटले भरले असा गंभीर आरोप केला आहे.

“या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तारतम्य बाळगलेलं नाही. त्यामुळे तपास होणं गरजेचं आहे. पण, त्यातून सत्य बाहेर येईल म्हणून या प्रकरणाचा तपास घाईघाईनं एनआयएकडे दिला,”

असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही. असं देखील पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना पत्र लिहिले होते. या पत्रात एल्गार परिषदेची संकल्पना माजी न्या. पी. बी. सावंत व माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांची होती.

प्रकृतीच्या कारणामुळे न्यायमूर्ती सावंत हजर राहू शकले नाही, तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले हे षड्यंत्र होते. तत्कालीन सरकारचे धोरण पुरोगामी, लोकशाही आवाज दडपून टाकण्याचे, सनदशीर संघर्ष चिरडण्याचे व संविधान वाचविण्याच्या चळवळीला खीळ घालण्याचे होते. असा गंभीर आरोप शरद पवार यांनी या पत्रात केला आहे.

शरद पवार यांच्या या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर सध्याकाळी 24 जानेवारीला या प्रकरणाचा तपास एनआयए कडे हस्तातरीत करण्यात आला.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा कल्पनाविलास सुरू असून या सगळ्या आरोपांची ठराविक वेळेत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीये. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/592243994671173/?t=2

दरम्यान कोरेगाव-भीमा दंगलीबाबत शरद पवारांनी केलेल्या आरोपाला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना या सरकारच्या कल्पना शक्तीबद्दल खुप कमाल वाटते. रोज उठून काहीतरी नवीन काढतात असं म्हटलं आहे. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2387048398274594/

Updated : 25 Jan 2020 8:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top