Home > News Update > पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया...

पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया...

पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया...
X

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही. फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' शरद पवारांवर अशी जहरी टीका करणाऱ्या गोपिचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर आज शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

ते साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना पडळकरांनी केलेल्या टीकेवर विचारले असता. पवार म्हणाले

हे ही वाचा..

पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

पंकजा ला पुन्हा शह!

"मला वाटत नाही की महत्व आहे. मला माहिती आहे की, माढ्याची निवडणूक लढवली होती. त्यांनी डिपॉझिट जप्त, बारामती विधानसभा निवडणुकीतही डिपॉझिट जप्त. ज्या-त्या वेळेला लोकांनी बाजूला केलेल्या माणसाची कशाला आपण नोंद घ्यावी" अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

Updated : 27 Jun 2020 10:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top