Home > News Update > पुण्यात शरद पवारांच्या हत्येचा कट; तक्रार दाखल

पुण्यात शरद पवारांच्या हत्येचा कट; तक्रार दाखल

पुण्यात शरद पवारांच्या हत्येचा कट; तक्रार दाखल
X

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा दावा केला गेलाय. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये यासंबंधित तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ता लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार भाऊ तोरसेकर (Bhau Torasekar) आणि पोस्टमन (Postman) पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.

लक्ष्मीकांत खाबिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की, गेले अनेक महिने समाजमाध्यामांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरविणे तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय ऐक्याला तडा जाईल असे अनेक पोस्टर सोशल मिडीयावर पाहात आहे.

विधानसभेच्या निवडणुकीचे राजकारण थांबल्यावर हे कमी होईल असे वाटल्याने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र, महाविकासआघाडीचे सरकार आल्यावर भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोक जे सातत्याने youtube वर (Postman Thinktak etc.) या चॅनेलद्वारा अपलोड केलेल्या व्हिडीओवरील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजामध्ये मा. पवार साहेबांना संपविले पाहिजे, बॉम्ब आणि गोळ्यांचा वापर केला पाहिजे. अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.

Updated : 8 Feb 2020 1:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top