Home > Max Political > बहिष्काराची भाषा; पवारांनी सुनावलं...

बहिष्काराची भाषा; पवारांनी सुनावलं...

बहिष्काराची भाषा; पवारांनी सुनावलं...
X

आज इथे आळंदीत आलोय. तो काही हेतू ठेवून आलेलो नाही. मी सगळ्या ठिकाणी जात असतो. पण माझा हेतू याचे प्रदर्शन करणे हा नसतो. काहींचा समज आहे की, राजकारण्यांना केवळ प्रसिद्धी हवी असते. मात्र, या गैरसमजाच्या रस्त्याला मी गेलेलो नाही. मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज आळंदी इथं बोलत होते.

जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आळंदीत आले होते. यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय वारकरी परिषदेने हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमाला शरद पवारांना आमंत्रित करु नये, अशी भूमिका घेतली होती. यावर अखंड महाराष्ट्रातील वारकऱ्यांसमोर पवार काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

राष्ट्रीय वारकरी परिषदेने हिंदू धर्मियांच्या कार्यक्रमाला शरद पवारांना आमंत्रित करु नये. अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय वारकरी परिषदेचा शरद पवारांनी चांगलाच समाचार घेतला. विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं, पण यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असं म्हणत पवारांनी सच्चा वारकरी अशी भूमिका कधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी ठेवायची असते, तिथे तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आलो, असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला चांगलाच टोला लगावला आहे.

यावेळी शरद पवार यांनी आळंदी तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्यासंबंधी देखील उल्लेख केला. या सगळ्या परिसराचा विकास करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि सुदैवाने मला जनतेने राज्य करण्याचा अधिकार दिला. याचा उपयोग समाजासाठी करायचा असतो असे संस्कार माझ्यावर आहेत. तुमचे जसे गुरू आहेत तसेच श्रद्धास्थान माझे देखील आहे. त्यांचे नाव यशवंतराव चव्हाण. चव्हाणसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की, जी संधी आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली त्यांचा विसर कधी पडू देऊ नका. त्या रस्त्याने मी जात आहे.

या वारकरी परंपरेचा समन्वय ज्ञानेश्वर महाराजांनी साधला.

तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयाला आली. तेव्हापासून आजवरच्या काळात देशाने अनेक हल्ले पाहिले. पण त्यात वारकरी परंपरेला कोणतीच शक्ती हलवू शकली नाही. त्याचे कारण परंपरेत असलेली बांधिलकी. याचा उल्लेख बहिणाबाईंनी केला आहे. पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि कळस संत तुकारामांनी घातला. या संतविचारधारेद्वारे सर्व समाजाची उंची कशी वाढेल याचे स्वरूप वारकरी शिक्षण संस्थेने दिले. असं म्हणत शरद पवार यांनी वारकरी परंपरेबाबत भाष्य केलं.

Updated : 8 Feb 2020 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top