शाहू महाराजांना मुजरा न करणारा कलाकार…

5729

शाहू महाराज कला प्रेमी होते. त्या काळात काळू बाळू या तमाशा कलावंतांच्या अगोदरची पिढी शिवा संभा कवलापुरकर यांचा तमाशा प्रसिद्ध होता. या जोडीतील संभा हे शाहू महाराज यांच्यासारखे दिसत होते. त्यांनी शरीरयष्टी देखील त्यांच्यासारखी कमावली होती. ते फेटा देखील महाराजांच्या सारखाच नेसायचे. तमाशामध्ये राजाचा ड्रेस घालून फेटा नेसला की ते हुबेहूब शाहू महाराज वाटायचे. कोल्हापूर येथील खासबाग मैदानात त्यांचा तमाशा होता. संभांचा प्रवेश होताच प्रेक्षक उठून उभा राहत होतं. ही गोष्ट कोल्हापूर येथे महाराजांपर्यंत गेली.

महाराज घोड्याचा ताफा घेऊन खासबाग मैदानात आले. महाराज येताच त्याठिकाणी असलेले प्रेक्षक उभा राहिले. इतर तमासगीर तसेच प्रेक्षक सर्वांनी महाराजांना लवून मुजरा केला. मात्र, स्टेजवर असलेले संभा आपल्या अभिनयातील डायलॉग म्हणत राहिले. त्यांनी मुजरा केला नाही. ही बाब तेथे असणाऱ्या सर्वांना खटकली.

वगनाट्य संपताच संभा खाली आला. संभा आणि त्यांनी महाराजांना तीन वेळा लवून मुजरा केला. याबाबत त्यांनी स्वतःच राजांना सांगितले. मी स्टेजवर खोटा का असेना? पण विक्रम राजाच्या भूमिकेत होतो. त्यामुळे विक्रम राजाने शाहू राजांना मुजरा करणे. हा त्यांचा अपमान झाला असता. मी आता एक वेळ काय तीन वेळा तुम्हाला मुजरा करतो.

एका तमाशा कलावंताची त्याच्या कलेवरची निष्ठा आणि त्याचा ताठ बाणा पाहून शाहू महाराज खूश झाले. त्यांनी संभा यांना सोन्याचे मिडल भेट दिले. त्या दोघांनी आयुष्यभर शाहू महाराजांचा आदर करत त्यांची ही आठवण जपून ठेवली. शिवा, संभा कवलापूर या तमाशा मंडळाची पुढची पिढी म्हणजेच काळू बाळू कवलापुरकर. या दोघांची कला महाराष्ट्रात अजरामर झाली.

सागर गोतपागर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here