Home > News Update > शाहीर संभाजी भगत यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

शाहीर संभाजी भगत यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

शाहीर संभाजी भगत यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र
X

शाहीर संभाजी भगत यांनी महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी भारतीय संविधानाबाबत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याची मागणी केली आहे.

माननीय शिक्षण मंत्री,

(महाराष्ट्र राज्य)

प्राध्यापक वर्षाताई गायकवाड

यांस,

स. न. . वि. वि.

प्रथम एक सामान्य नागरिक आणि एक शिक्षक म्हणून मी आपल्या निर्णयाचे स्वागत करतो आणि आपले आभारही मानतो .

आपण संविधानाच्या प्रस्तविकेचा प्रत्येक शाळेत परिपाठाचा भाग म्हणून वाचन करावे. या संबंधी जो निर्णय घेतलात याबाबत संविधानप्रेमी शिक्षकांच्या वतीने आपणास जाहीर समर्थन देतो.

काही शाळांमधून हा उपक्रम काही जागरूक शिक्षक राबवत आहेत. यामागे मी सायन सेकंडरी या शाळेत प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. तेथे मला हे अनुभवास आले. तिथे रोज एक शिक्षक संविधानाच्या एका एका तत्वावर पाच मिनिटे बोलतात हे कळाले. मला खूप आनंद झाला. हे चित्र आशादायी असले तरी 2018 साली 26 जानेवारीला 4 कॅमेरे घेऊन आम्ही शाळा शाळांतून शिक्षकांना संविधाना बद्दल काय माहिती आहे. याचा शोध घेतला तर फारच निराशाजनक रिपोर्ट हाती आला.

या पत्राद्वारे मी एक संविधान संरक्षक नागरिक म्हणून आपणास विनंती करतो आणि एक कृतिकार्यक्रमही सुचवू इच्छतो, ज्याद्वारे शिक्षकांना संविधानाची उद्देशिका नीट समजेल.

या संबंधी सरकारने शिक्षक वर्गासाठी एक मोहीम हाती घ्यावी आणि शिक्षक वर्गाला खलील मुद्दे नीट शिकवावेत.

1) भारतीय संविधानावर सकल भारतीय संस्कृतीचा प्रभाव

कारण संविधान विरोधी शक्तींनी प्रचार केला आहे की, आपल्या संविधानाचा भारतीय संस्कृतीशी सबंध नाही. सत्य काही वेगळेच आहे. भारतातील सर्व मानवतावादी धर्म संस्कृतीचा अर्क संविधानाच्या उद्देशिकेत आहे.

2) भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया

कारण संविधान विरोधी शक्तींनी प्रचार केला आहे की, हे संविधान समाजाच्या फक्त एका वर्गासाठी लिहले आहे. ते सर्वांसाठी नाही. सुरुवातीला हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. हे ते सांगत नसत.1990 नंतरच्या जागरूक नागरिकांच्या पिढीने आणि खास करून तळागाळातील बुद्धिजीवींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत. याचा उच्चार केला.

परिणामी बाबासाहेबांचा उल्लेख पाठपुस्तकात झाला. परिणामी आणखी एक गैरसमज निर्माण झाला की, ते फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्तिशः एकट्यानी स्वतंत्रपणे एखादा वैचारिक ग्रंथ लिहावा तसे लिहले आहे. वस्तुतः वास्तविकता तशी नाही संविधान निर्मितीची प्रक्रिया नीट माहीत नसल्याने संविधान सभा आणि त्यातील डॉक्टर बाबासाहेबांचे योगदान आणि स्थान या बाबत बरेच गैरसमज पसरले आहेत.

3) भारतीय संविधानाची उद्देशिका हे संपूर्ण एकच वाक्य आहे. त्याचे काही भाग आहेत, त्याचा पहिला भाग संविधान कोणी कोणाला अर्पण केले आहे आणि आम्ही भारताचे लोक म्हणजे नेमेके कोण?? भारतीय असणे म्हणजे कोण असणं. या बाबत संविधान विरोधी शक्तींनी भारतीयत्व म्हणजे विशिष्ठ एका धर्माचे लोक असं ठसविलं आहे.

4) वाक्याच्या पुढील भागात आम्हाला नेमका कोणता? आणि कश्याप्रकारच भारत घडवायचा आहे? हे स्पष्ट केले असले तरी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या दोन शब्दांबाबत खूप चुकीचे संदेश संविधान विरोधी शक्ती रोज पसरवत आहेत. सामान्य शिक्षकांना याबाबत सत्य समजने गरजेचे आहे.

5) उद्देशिकेच्या पुढील भागात भारतीय संविधान नागरिकांना काय देते याचा उहापोह आहे.

6) उद्देशिकेच्या पुढील भागात नागरिकांनी आपल्या अंगी कोणती मूल्य बनावीत या संबंधी हक्कासोबत कर्तव्य काय असावीत याचा उलगडा केला आहे.

7) भारतीय संविधानाची मार्गदर्शक तत्वे काय आहेत हे प्रत्येक नागरिकाला कळायला हवं.

वरील मुद्द्यांना घेऊन शिक्षक वर्गाचे प्रशिक्षण झाले पाहिजे.

आपला विश्वासू

संभाजी भगत

Updated : 22 Jan 2020 2:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top