Home > News Update > न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी का दिला राजीनामा?

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी का दिला राजीनामा?

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी का दिला राजीनामा?
X

मुबंई हायकोर्टाचे जेष्ठ न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. धर्माधिकारी यांनी त्यांच्या कोर्टातल्या वकिलांना माझा आजचा शेवटचा दिवस असल्याचं सांगीतल.

न्यायालयीन कामाच्या धावपळीमुळे धर्माधिकारी यांना आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नव्हता. त्यांना मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती हवी होती. मात्र धर्माधिकारी यांना दुसऱ्या राज्यात मुख्य न्यायमूर्ती पदावर बढती मिळाली. माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे मला महाराष्ट्र सोडून जायचं नव्हतं. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला असं न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सांगितल. दोन वर्षानंतर ते निवृत्त होणार होते.

सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या कुटुंबाची वकिलीची पार्श्वभूमी आहे. १९६० मध्ये त्यांचा जन्म झाला. मुबंई विद्यापीठातून LLB चं शिक्षण पूर्ण केलं. १९८३ मध्ये त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात प्रॅक्टीस केली.

काही काळ ते मुबंई विद्यापीठाच्या कायदा विभागाचे सदस्य होते. मुबंई आणि गोवा बार काऊन्सिलमध्ये सदस्यपदावर त्यांनी काही काळ काम केलं. 2003 मध्ये मुबंई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नादरजोग यांच्यानंतर दुसरे जेष्ठ न्यायाधीश आहे. न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी यांचे वडील चंद्रशेखर धर्मधिकारी यांनी देखील मुबंई हायकोर्टाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम केलंय.

Updated : 14 Feb 2020 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top