Home > News Update > माझी अहिंसा दुबळ्यांची अहिंसा नाही! - निखिल वागळे

माझी अहिंसा दुबळ्यांची अहिंसा नाही! - निखिल वागळे

माझी अहिंसा दुबळ्यांची अहिंसा नाही! - निखिल वागळे
X

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका तरुणाने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या तरुणाने आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समक्ष मारहाण केली असा या तरुणाचा आरोप आहे.

या घटनेनंतर वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काहीजण आव्हाड यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत तर काहीजण तरुणाच्या बाजूने उभे आहेत.

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीही याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. मी तत्वत: अहिंसावादी आहे. पण माझी अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नाही असं निखिल वागळे यांनी म्हटलंय. '६ वर्ष तुम्ही गलिच्छ पातळीला जाऊन एखाद्याचा छळ करणार आणि त्याने गप्प बसायचं ? ज्याने मार खाल्ला त्याने आपण काय अश्लील कृत्य केलं सांगावं. मग या विकृतीचा बुरखा फाटेल' असंही वागळे म्हणालेत. सोशल मिडियाचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलिसांनी त्वरित कारवाई केली नाही, तर अशा हिंसक घटना घडणारच! असा इशाराही त्यांनी दिलाय.

यासोबतच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रत्येक हिंसेमागे काही ना काही कारण असणार आहे. आपण निवडक हिंसा मानणार असू, तर ती हिंसेइतकीच भयानक असते असं चौधरी यांनी म्हटलंय.

दै. दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांनीही या घटनेविषयी मत मांडलं. 'शरद पवार माझे बाप आहेत असं म्हणून चालत नाही, बाप समजावा लागतो, अशा शब्दांत संजय आवटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बिनशर्त माफी मागावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

https://www.facebook.com/715559918/posts/10158250606124919/?d=n

Updated : 8 April 2020 12:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top