Home > News Update > मुंबईत शार्जिलच्या समर्थनार्थ घोषणाबाजी: देशद्रोहाचे गुन्हे दाखल

मुंबईत शार्जिलच्या समर्थनार्थ घोषणाबाजी: देशद्रोहाचे गुन्हे दाखल

मुंबईत शार्जिलच्या समर्थनार्थ घोषणाबाजी: देशद्रोहाचे गुन्हे दाखल
X

जेएनयूचा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या ५० जणांविरुध्द मुंबई पोलिसांनी देशद्रोहाअंतर्गत गुन्हे दाखल केलेत. १ फेब्रुवारीला आझाद मैदानावार गे प्राईड दिवस साजरा झाला होता. या दरम्यान या घोषणा दिल्या गेल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ माजी खासदार किरीट सौमय्या यांनी सोशल मिडीयावर वायरल केला होता.

शार्जिल इमाम (Sharjil Imam) याला दिल्ली पोलिसांनी २८ जानेवारीला अटक केली. देशाचे तुकडे करण्याच्या भाषणावरुन इमामवर पाच राज्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

मुंबई पोलिसांनी उर्वशी चारुवाला यांच्यासह ५० जणांविरुध्द गुन्हे दाखल केलेत. शर्जील तेरे सपनो को हम मंजील तक पोहोचायेंगे. अशा घोषणा देतांना हे तरुण या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसताहेत असा दावा मुंबई पोलिसांनी केला. या तरुणांवर १२४ (अ) आणि १५३ (ब). कलम ५०५, ३४ या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. लवकरचं या तरुणांना जबाब घेण्यासाठी आम्ही बोलावणार आहोत. त्यानंतर गरज पडल्यास त्यांना अटक करण्यात येईल असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मुंबईत आझाद क्रांती मैदानावर १ फेब्रुवारी रोजी गे प्राईड परेडचं आयोजन केलं गेलं होत. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. अचानक या परेडऐवजी सुधारीत नागरीकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय़ एका संघटनेनं घेतला. मात्र यामध्ये शार्जिल इमाम याच्या समर्थनार्थ नारे देण्यात आले. रॅलीत काही असामाजिक तत्व शिरले असल्याची प्रतिक्रीया आयोजकांनी दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही नारेबाजी देणाऱ्या तरुणांवर टिका केली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी NRC आणि CAA विरोधात आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या संघटनांना थांबवावं अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आम्हाला काही अपेक्षा नाही. मात्र देशभक्तीची परंपंरा असलेल्या शिवसेनेने तरी या आंदोलनाला अटकाव करावा अशी अपेक्षाही फडणवीस यांनी केलीय.

दरम्यान क्विर आझादी मुंबई या संघटनेनं CAA विरोधात आंदोलनाचं आयोजन केलं होत. मात्र शार्जिलच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱे तरुण आमच्या संघटनेचे सदस्य नव्हते असा दावा या संघटनेनं केलाय. नारेबाजी करणाऱ्या तरुणांनी आमच्या आंदोलनात घुसखोरी केली. या प्रकारच्या देशद्रोही घोषणांना आमचा विरोध आहे. असही संघटनेच्या प्रवक्यांनी म्हटलय.

Updated : 4 Feb 2020 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top