मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल उडवून देण्याची पाकमधून धमकी

Security tightened outside hotel taj after threat call from Karachi

26/11 च्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेली मुंबईतील ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे कुलाबा आणि वांद्रे इथे ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर या परिसरात देखील ककडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा कराचीमधून ताज हॉटेल बॉम्बे उडवून देण्याची धमकी देण्यारा फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या धमकीची गंभीर दखल घेत पोलिसांनी या दोन्ही हॉटेलची सुरक्षा वाढवलेली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकीस्तानच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये काही जण मारले गेले होते . एकीकडे मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे.

सरकारने लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवलेले आहे. त्यातच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांवर ताण येतोय. तर दुसरीकडे ही धमकी आल्यामुळे आता पोलिसांवर बंदोबस्तचा देखील अतिरिक्त ताण वाढलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here