पहिली ते नववी आणि अकरावीचे विद्यार्थी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात!

कोरोना विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. पण आता नजीकच्या काळातही परीक्षा घेण शक्य नसल्याने छत्तीसगड सरकारनं पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना 2019-20 या शैक्षणिक वर्षात परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मंगळवारी ही घोषणा केली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च ते १४ एप्रिल देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं असलं तरी छत्तीसगडमध्ये २० मार्चपासूनच लॉकडाऊन करण्यात आलं होतं. तसंच सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. पण आता या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.