‘आम्हाला जगवायचं की मारायचं तुमच्या हातात आहे’

217
पुराचं पाणी ओसरतंय तशी वाट दिसतेय आणि माणसं मदतीसाठी उभ्या कॅम्प पर्यंत पोहचत आहेत. आत्तापुरती राहायची, खायची आणि कपड्यांची सोय होतेय असं पूरग्रस्त म्हणतायत. पण आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्या आता पुढे काय? या प्रश्नाने तासगावच्या पूरग्रस्त आक्काताई काटे यांची डोळ्याची किनारं पाण्याने भरली. “आम्हाला जगवायचं की मारायचं तुमच्या हातात आहे. आमच्याकडे काही नाही पार धुवून गेलोय.” असे त्यांनी म्हटलं. सांगलीमधील तासगाव तालुक्यातील पुरग्रस्तांनी आपल्या बिकट परिस्थितीचं मांडलेले रौद्र रूप. पाहा व्हिडिओ :