आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरच शपथ घेईल- संजय राऊत
X
राज्यात शेतकरी शेतीच्या नुकसानामुळे त्रस्त आहे तर राजकारणी सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नाही म्हणुन...आता राजकीय वाटाघाटी करण्यातुन नेतेमंडळींना शेतकऱ्यांसाठी सवड मिळत असल्याचं दिसतय. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगाबाद येथे ओल्या दुष्काळी दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. सोबतच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) ही रत्नागिरी दौऱ्यासाठी निघाले आहेत. मात्र मुंबईच्या सेनागडातुन तोफा डागत राहण्याची आणि सत्तेचा किल्ला लढवत ठेवण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
- सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे पाच पर्याय..
- नक्की काय घडतंय राजकीय पटलावर - विलास आठवले
- आज कुणावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी?
सामना मधुन प्रकाशित अग्रलेखाविषयी पत्रकारांशी संवाद साधताना “दहा दिवस झाले तरी बहुमत मिळालेल्या पक्षाने आपलं बहुमत सिद्ध केलं नाही. अनेक ठिकाणी मैदानं आणि रेसकोर्स बुक केल्याची माहिती मिळत आहे. आता किती ठिकाणी शपथविधी होणार मला माहिती नाही. मात्र, आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरच शपथ घेईल.” असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खात्रीने सांगितले आहे.
https://youtu.be/Ab1-dzz34Nk