Home > News Update > विट्याचे सोनू सूद ' सुनील सुतार' !!

विट्याचे सोनू सूद ' सुनील सुतार' !!

विट्याचे सोनू सूद  सुनील सुतार !!
X

सोनू सूद या अभिनेत्याने लॉकडाउन मध्ये अडकलेल्या अनेक कामगारांना गावी जाण्यासाठी मदत केल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या. कामगारांना केलेल्या मदतीमुळे सोनू सूद वर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोना च्या काळात घरच्यांनी नाकारल्याने स्मशानात राहायची वेळ लोकांवर आली. जवळच्या माणसाचा मृतदेह नाकारण्याच्या घटना घडल्या. या घटना जेथे घडत आहेत. त्याच भागात माणुसकीच्या नात्याने लोकांना मायेचा आधार देण्याच्या घटना घडत आहेत.

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष असलेल्या सुनील सुतार या अवलियाने अशाच प्रकारे शेकडो कामगारांना आपल्या घरी पोहचवण्यासाठी सर्वोपरी मदत केली आहे. विटा शहर आणि परिसरात अनेक राज्यातील कामगार लॉक डाउनमुळे अडकलेले होतें. सरकारने त्यांना ई पास देण्याची घोषणा केली होती. मात्र, बहुसंख्य कामगार अशिक्षित होते. त्यांच्याकडे हा पास भरण्यासाठी साधने पुरेशी नव्हती. त्यामुळे कामगार हताश होते. शहरात इंटरनेट कॅफे बंद होते. यावर सुनील सुतार यांनी सरकारकडे सध्या घरी असलेल्या विभागातील कर्मचाऱ्यांना घेऊन ई पास भरण्यासाठी मदत केंद्रे उभी करावी. अशी विनंती केली.

मात्र, या विनंतीचे पुढे काही झाले नाही. स्वतःच्या घरी जाण्याची मानसिकता बनवलेले कामगार अस्वस्थ होते. यावर गप्प न बसता त्यांनी स्वत:च्या कार्यालयात बसून ई पास साठी अर्ज भरून देण्यास सूरवात केली. यासाठी कसलेही शुल्क न घेता, सकाळी सात ते रात्री उशिरा पर्यंत त्यांनी काम सुरू केले.

त्यांच्या प्रयत्नाने बिहार झारखंड, ओडिसा कर्नाटक अशा राज्यात जवळपास सहाशेच्या वर मजूर स्वतःच्या घरी पोहचू शकले. त्यांनी केलेल्या प्रयत्नातून तब्बल पंधरा गाड्या वेगवेगळ्या राज्यात गेल्या. या सर्व मजुरांची माहिती त्यांनी संकलित केली आहे. स्वतःच्या घराच्या ओढीने अस्वस्थ शेकडो कुटुंबीयांना घरी पोहचवण्या त यशस्वी झालेल्या सुनील सुतार यांना विट्याचे सोनू सूद म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

Updated : 4 Jun 2020 7:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top