Home > News Update > सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेची भाजपला साथ, महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेची भाजपला साथ, महाविकास आघाडीचा प्रयोग फसला

सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेची भाजपला साथ, महाविकास आघाडीचा प्रयोग फसला
X

सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या प्राजक्ता कोरे आणि उपाध्यक्षपदी भाजपाचेच शिवाजी डोंगरे हे विजयी झाले आहेत. भाजपच्या उमेदवारांनी, 35 विरुद्ध 22 मतांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला.

सांगली जिल्हा परिषदेत शिवसेना, रयत विकास आघाडी, घोरपडे गट आणि अपक्ष सदस्यांनी यांनी भाजपला पाठिंबा दिला. सांगली जिल्हापरिषदेत 'महाविकास आघाडीचा प्रयोग' झाला नाही. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची एकत्र निवडणूक लढवली.

सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कलावती गौरगौड आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे जितेंद्र पाटील हे पराभूत झाले.

सांगली जिल्हा परिषद संख्याबळ

भाजपा 26, शिवसेना 3, रयत विकास आघाडी 4, अजितराव घोरपड़े गट 2

भाजपचे एकूण संख्याबळ 35

तर विरोधी पक्षातील राष्ट्रवादी 13, कॉंग्रेस 8 सदस्य तर स्वाभीमानी शेतकरी संघटना 1 सदस्य असं एकूण 22 सदस्यांचं संख्याबळ मतदानाला उपस्थित होतं. काँग्रेसचे एक जागा रिक्त आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक एक सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीच 22 इतकेच संख्याबळ राहिले.

Updated : 2 Jan 2020 4:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top