Home > News Update > समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित  

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित  

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित  
X

समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा ड्रिम प्रोजेक्ट मानला जात होता या प्रकल्पाला माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचं त्यांनी ठरवलं होतं मात्र तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे शिवसेना (Shivsena) आणि फडणवीस यांच्य़ामध्ये मतभेद निर्माण झाले होते. आता भाजप (BJP) सत्तेतून बाहेर पडल्यानंतर या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूर—मुंबई समृद्धी महामार्गाचं (Samrudhi Mahamarg) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असं नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी जाहीर केला. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये इतकी रक्कम शासनाकडून भागभांडवली अनुदान म्हणून देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचाही शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Updated : 20 Dec 2019 5:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top