Home > News Update > सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, सलमान खानचे चाहत्यांना आवाहन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, सलमान खानचे चाहत्यांना आवाहन

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, सलमान खानचे चाहत्यांना आवाहन
X

अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेलं असलं तरी बॉलिवूडमधील एका गटावर आता जोरदार आरोप होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील काही लोक जबाबदार आहेत असा आरोप केला जातोय.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर सलमान खान याला देखील ट्रोल करण्यात आले होते. त्याचबरोबर एक दिग्दर्शकाने सतर सलमान खान आणि त्याच्या परिवारावर त्याचे करियर संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. सगळ्या पार्श्‍वभूमीवर सलमान खानने आता मौन सोडलेले आहे आणि ट्विट करून आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

हे ही वाचा..

सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा, राज्यातील एका मंत्र्याची मागणी

सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला, मृत्यूचं नेमकं कारण काय?

सुशांत सिंहची आत्महत्या नव्हे हत्या, नातेवाईकांचा गंभीर आरोप

"मी माझ्या फॅन्सना आवाहन करतो की त्यांनी सुशांत सिंह च्या फॅन्सच्या बाजूने उभे रहावे. त्यांनी दिलेल्या शिव्या शापांचा विचार न करता, चुकीची भाषा न वापरता त्यामागील भावना समजून घ्याव्या. तुम्ही सुशांत सिंहचा परिवार आणि त्याच्या फॅन्सच्या बाजूने उभे राहावे कारण आपली एखादी व्यक्ती निघून जाणं हे खूप वेदनादायी असतं"

सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांवर सलमान खान यांने पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया दिलेली आहे. सुशांत सिंह याने मुंबईतील वांद्रे येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. पण त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. दरम्यान मुंबई पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. सुशांत सिंह याची आत्महत्या नसून त्याला आत्महत्या करायला कोणीतरी भाग पडलं असा आरोप देखील त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देखील काही राजकीय नेत्यांनी केलेली आहे.

Updated : 21 Jun 2020 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top