Home > News Update > #कोरोनाशी लढा – सचिन तेंडुलकरची ४ हजार गरजवंतांना मदत

#कोरोनाशी लढा – सचिन तेंडुलकरची ४ हजार गरजवंतांना मदत

#कोरोनाशी लढा – सचिन तेंडुलकरची ४ हजार गरजवंतांना मदत
X

कोरोनाच्या संकटकाळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या लोकांच्या मदतीसाठी अनेक NGO काम करत आहेत. पण या NGO ना गरज असते ती आर्थिक मदतीची...त्यासाठी समाजातील मोठ्या व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हे ही वाचा…


पुणे जिल्ह्यात कोरानमुक्त रुग्णांची संख्या ८२७

कबाल चहल यांनी स्वीकारली मुंबई पालिका आयुक्तपदाची सूत्रं

मुंबईतील अशाच एका NGO ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आर्थिक मदत केली आहे. मुंबईतील ४ हजार गरजवंतांना ज्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सचिनने Hi5 Youth Foundationला मोठी मदत केली आहे. या संस्थेने ट्विट करुन सचिनचे आभार मानले आहेत.

या ट्विटला उत्तर देताना, “रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना मदत करण्याऱ्या Hi5 फाऊंडेशनला शुभेच्छा”, असे सचिनने म्हटले आहे. याआधी सचिनने PM CARE फंडात २५ लाखांची देणगी दिली आहे

Updated : 9 May 2020 3:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top