Home > News Update > सामना अग्रलेख : फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका

सामना अग्रलेख : फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका

सामना अग्रलेख : फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका
X

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यातच भाजप (BJP) ‘आमचं सरकार येणार’ असं वारंवार सांगत आहे. यावर शिवसेनेने (Shivasena) आजच्या ‘सामना’ (Samana) तून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट (President's rule) लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का!... हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीत पडद्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुन्हा आमचेच सरकार! अशा किंकाळ्या महाराष्ट्राच्या (Maharashtra ) कानाचे पडदे फाडत आहेत, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. आम्हाला चिंता वाटते, महाराष्ट्रात वेड्याच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत. असं म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय सामनात

नवी समीकरणं जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. कोण कसे सरकार बनवतो तेच पाहतो अशा प्रकारची अप्रत्यक्ष भाषा व कृती सुरू झाली आहे. सहा महिन्यांच्या वर सरकार टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो.

महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल.

एकतर नरेंद्र मोदी (devendra fadanvis) यांच्यासारख्या नेत्यांच्या नावाने त्यांचे खेळ सुरू आहेत व यात मोदी (Narendra modi)यांचेच नाव बिघडत आहे. आमच्याकडे बहुमत नाही! त्यामुळे सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? जे बहुमत त्यांच्यापाशी आधी नव्हते ते राष्ट्रपती राजवटीच्या वरवंटय़ाखालून कसे बाहेर पडणार, हा प्रश्न असला तरी आम्ही लोकशाही व नैतिकतेचा खून करून ‘आकडा’ लावू शकतो ही भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही. राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत.

स्वच्छ, पारदर्शी कारभार करण्याचे वचन देणाऱ्यांचा हा खोटारडेपणा आहे व तो पुनःपुन्हा उघड होत आहे. सत्तेचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन येथे कुणी जन्मास आलेले नाही. एका बाजूला फडणवीस ‘‘राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार!’’ असा दावा करतात तर दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी (Nitin gadakari) यांनी क्रिकेटचे रबरी चेंडू राजकारणात टोलवले आहेत. ‘क्रिकेट व राजकारणात अंतिम काहीच नाही. कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल फिरू शकतो. एका क्षणी हातातून गेलेल्या सामन्यात आपण विजय मिळवू शकतो,’ असा सिद्धांत गडकरी मांडतात. गडकरी यांचा क्रिकेटशी संबंध नाही. त्यांचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर वगैरे वस्तूंशी आहे. संबंध असलाच तर तो शरद पवार आणि क्रिकेटचा आहे.

‘‘पुन्हा आमचेच सरकार!’’ अशा किंकाळय़ा महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडेल. आम्हाला चिंता वाटते, महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत. आम्ही त्या सगळ्यांना पुन्हा प्रेमाचा सल्ला देतो, इतके मनास लावून घेऊ नका. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे जसे सत्य तसे कुणीच अजिंक्य नाही हेसुद्धा सत्यच आहे. महाराष्ट्रात सत्य भगव्याच्या तेजाने फडकणार आहे.

Updated : 16 Nov 2019 5:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top