Top
Home > News Update > सामना अग्रलेखावर बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया

'सामना' अग्रलेखावर बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया

सामना अग्रलेखावर बाळासाहेब थोरात यांची पहिली प्रतिक्रिया
X

राज्यातील महाविकास आघाडीतील सरकारमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे दोन ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनीही जरा आमचेही ऐका, असे म्हटल्याने महाविकास आघाडीत कुरबुरी असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कबूल करण्यात आले आहे. पण त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांना चिमटे काढत राष्ट्रवादी काँग्रेस जसे सहकार्य करत आहे. तसे काँग्रेस करत नसल्याची टीका केली होती.

त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या टिकेला आज माध्यमांशी बोलताना उत्तर दिलं. अपुर्ण माहितीवर सामनाचा अग्रलेख असून पूर्ण माहितीवर आधारीत अग्रलेख लवकरच सामनातून वाचायला मिळेल. असं थोरात यांनी म्हटलं आहे.

Updated : 16 Jun 2020 2:10 PM GMT
Next Story
Share it
Top