Home > News Update > आता पत्रकारांनाही ५० लाखांचं विमा कवच

आता पत्रकारांनाही ५० लाखांचं विमा कवच

आता पत्रकारांनाही ५० लाखांचं विमा कवच
X

“केवळ डॉक्टर आणि पोलीसचं नाही तर पत्रकारही करोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवानं जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही बरे व्हालचं. दुर्देवानं कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचं विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही,” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

अलिकडे अनेक पत्रकारांना वार्तांकन करताना कोरोनाची लागण झाली होती. काही मुंबईतील एका बड्या चॅनल मधील पत्रकाराचा कोरोना ने मृत्यू देखील झाला आहे. या संदर्भात अनेक पत्रकारांनी, राजकीय नेत्यांनी पत्रकारांना देखील वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे विमा संरक्षण देण्यात यावं. अशी मागणी केली होती. या मागणीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

“जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. तसंच करोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचं हे विमा कवच मिळणार आहे,” आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या या निर्णयाचं सर्व पत्रकारांनी स्वागत केलं असून राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

Updated : 4 Jun 2020 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top