Home > News Update > कर्जत जामखेड : अपक्ष रोहित पवार यांचा अर्ज रद्द

कर्जत जामखेड : अपक्ष रोहित पवार यांचा अर्ज रद्द

कर्जत जामखेड : अपक्ष रोहित पवार यांचा अर्ज रद्द
X

कर्जत – जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. अपूर्ण शपथपत्र दाखल केल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला आहे.

रोहित हे कर्जत येथील रहिवाशी असून त्यांनी कर्जत जामखेड येथून अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात थेट लढत आहे. मात्र, रोहित पवार या व्यक्तीने अर्ज दाखल केल्यानं राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांना मोठा फटका बसण्याची शक्यता होती.

खासदार सुनिल तटकरे यांचा देखील समान नावाचे उमेदवार असल्यामुळे एका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे अपक्ष रोहित पवार यांची उमेदवारी रद्द झाल्याने राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या मतविभाजन चे संकट एक प्रकारे टळले आहे.

Updated : 5 Oct 2019 12:37 PM GMT
Next Story
Share it
Top