Home > News Update > या राज्यात मद्यविक्रीला परवानगी !

या राज्यात मद्यविक्रीला परवानगी !

या राज्यात मद्यविक्रीला परवानगी !
X

लॉकडाऊनमुळे सारा देश ठप्प झाला असताना केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कोट्यवधी लोकांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण आता आसाममध्ये १३ एप्रिल म्हणजेच सोमवारपासून किरकोळ मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७ तास मद्याची दुकाने सुरू असतील. पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच इथं मद्यविक्री करावी, तसंच सॅनिटायझरची सोय करावी, कमीत कमी कर्मचारी ठेवावे असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. मद्यविक्रीला परवानगी दिली असली तरी आरोग्य विभागातर्फे लागू कऱण्यात आलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करणाऱ्या विक्रेत्यांनाच परवानगी दिली जाणार असल्याचं सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

याचबरोबर होलसेल वेअरहाऊसेस, डिस्टिलरी प्रकल्प आणि दारुभट्ट्या सुरू कऱण्यासही परवानगी देण्यात आली आहे. या उद्योगांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवावे, तसेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सोयसुद्धा त्या कंपनीच्या आवारातच करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन कऱण्याच्या सूचनाही सरकारने काढलेल्या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Updated : 13 April 2020 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top