Home > News Update > पुणे विभागात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के

पुणे विभागात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के

पुणे विभागात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के
X

पुणे विभागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. विभागात आतापर्यंत10 हजार 756 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 17 हजार 342 झाली आहे.

ॲक्टीव रुग्ण 5 हजार 828 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 296 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.02 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.37 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

हे ही वाचा..

#कोरोनाशी_लढा- आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

#कोरोनाशी_लढा- गृहनिर्माण सोसायट्यांना सहकार मंत्र्यांचा इशारा

ग्रामीण भागात अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करणं खरंच शक्य आहे का?

गेल्या २४ तासात पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 873 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 766, सातारा जिल्ह्यात 4, सोलापूर जिल्ह्यात 86, सांगली जिल्ह्यात 15 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 अशी रुणसंख्या आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

#पुणे

जिल्हयातील 13 हजार 685 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 8 हजार 351 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 794 आहे. कोरोनाबाधित एकूण 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 275 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.02 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.95 टक्के इतके आहे.

#सातारा

जिल्हयातील 770 कोरोना बाधीत रुग्ण असून 571 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 161 संख्या आहे. कोरोनाबाधित एकूण 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

#सोलापूर

जिल्हयातील 1 हजार 897 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 48 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 685 आहे. कोरोना बाधित एकूण 164 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

#सांगली

जिल्हयातील कोरोना बाधीत 262 रुग्ण असून 130 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 124 संख्या आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

#कोल्हापूर

जिल्हयातील कोरोना बाधीत 728 रुग्ण असून 656 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 64 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 19 Jun 2020 2:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top