‘मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा’ – रावसाहेब दानवे

विवादीत वक्तव्य आणि रावसाहेब दानवे (raosaheb danve) हे समीकरण संपुर्ण महाराष्ट्राला अवगत झालं आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा असाच एक वादग्रस्त विधान असलेला रावसाहेब दानवे यांचा निवडणूक(election)  प्रचारसभेतील भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर (social media) व्हायरल होत आहे.

या भाषणात ‘मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा’ असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. दानवेंनी आपल्या या भाषणात “केंद्र सरकारने जेव्हा पहील्यांदा गोवंश हत्या (cow slaughter) बंदी लागू केली तेव्हा यांच्यापैकी काही जण माझ्याकडे आले. म्हणाले साहेब हे तुमच्या सरकारने काय केलं. बकरी ईद आली आहे साहेब आता कसं करायचं? मी म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले अहो ते गोहत्या बंदी आहे ना, कापु देत नाहीत. मी त्यांना म्हटलं मी असेपर्यंत खुशाल कापा.” असं म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं गोहत्या बंदी कायद्याची देशभरात अंमलबजावणी केली. परंतु इकडे त्यांच्याच सरकारमधले केंद्रीय मंत्री आता हे वक्तव्य करत आहेत. १९ ऑक्टोबरला रावसाहेब दानवे यांनी जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात कठोरा बाजार या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या सभेत असं म्हटलं आहे.

या वादग्रस्त वक्तव्यामुळे दानवे चांगलेच अडचणीत आले आहेत. परंतु भाजपच्या गोवंश हत्या बंदीचं काय झालं? मतांसाठी भाजप नेत्यांनी आपली तत्व बाजुला ठेवली आहेत का? हा प्रश्न उपस्थित होतो.