Top
Home > News Update > काम बंद, मंदीर सुरू...

काम बंद, मंदीर सुरू...

काम बंद, मंदीर सुरू...
X

सध्या देशात मोठ्या उत्साहात राम मंदिराच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम सुरु आहे. माध्यमांवर मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. देशात मोठा माहोल तयार केला जात आहे. राम मंदिराचे भूमिपुजन झाले म्हणजे सर्व समस्या संपल्या आहेत. असा माहोल तयार केला जात आहे.

मात्र, वस्तुस्थिती काय आहे?

राज्यात बेरोजगारीचा दर गेल्या आठवड्यात 27.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्या आधीच्या आठवड्यात तो 21.1 टक्के होता. तर एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर 23.5 टक्के होता. देशात दररोज अनेक लोकांचा मृत्यू होत आहे. लोकांच्या हाताला काम नाही. अनेक लोक बेरोजगार आहेत.

देशातील बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असताना माध्यमांवर या वाढत्या बेरोजगारीचं चित्र पाहायला मिळत नाही.

हे ही वाचा...

आमच्या देशात रॉकस्टार का निर्माण होत नाहीत?

शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचं निधन

रामापेक्षा मोदी मोठे, भाजप खासदाराच्या ट्विटने नवा वाद

गेल्या काही वर्षाच्या बेरोजगारीच्या आकडेवारीवर विचार केला तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय त्यांच्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये देशातील 11 राज्यात सरासरी पेक्षा जास्त बेरोजगारी असल्याचं समोर आलं होतं. 2011 -12 मध्ये हरीयाणा, आसाम, झारखंड, केरळ, ओडिसा, उत्तराखंड आणि बिहार मध्ये बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त होता. परंतु आता 2017-18 मध्ये या यादीत पंजाब, तमिळनाडु, तेलंगणा आणि उत्तरप्रदेश ही राज्य देखील जोडली गेली आहेत. NSSO च्या वार्षिक आकडेवारीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

यावर भरास भर कोरोनाची साथ आल्यानं मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले आहेत. कधी थाळ्या तर कधी टाळ्या वाजवू कोरोनाला घालवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापपर्यंत तो सफल होऊ शकलेला नाही. नोटाबंदी प्रमाणे राज्यकर्त्यांचा टाळ्या थाळ्या वाजवण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता राम मंदिर भूमिपुजनाच्या कार्यक्रमाचा ढोल वाजवला जाणार आहे.

भावनिक राजकारण, विकासाचं गळा घोटतं. राम मंदिराच्या मुद्द्यावर पुढील काळात निवडणूकाही होतील. राम मंदिर उभं राहिल्य़ानं लोक मतदान ही करतील. मात्र, लोकांच्या पोटा पाण्याच्या प्रश्नाचं काय? हा प्रश्न कायम राहणार आहे. रामाचं झालं मात्र, कामाचं काय सवाल देखील राज्यकर्त्यांना विचारायलाच हवा... यावर माध्यमं कधी प्रश्न विचारणार?

Updated : 5 Aug 2020 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top