अखेर राज्यसभेच्या 18 जागांसाठी निवडणुकांची तारीख जाहीर, ज्योतिरादित्य शिंदे यांची वर्णी?

rajya-sabha-elections-to-fill-18-seats-from-states-of-andhra-pradesh-gujarat-jharkhand-madhya-pradesh-manipur-meghalaya-rajasthan-to-be-held-on-19th-june

कोरोना संकटामुळे स्थगित झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात 18 जागांसाठी 19 जूनला मतदान होणार आहे.

आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपुर, मेघालय आणि राजस्थान मध्ये या निवडणूका होणार आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश 4, झारखंड 2, मध्य प्रदेश 3, मणिपुर 1, राजस्थान 3, गुजरात 4, आणि मेघालय 1 असं जागांचं विभाजन आहे.

विशेष म्हणजे मध्यप्रदेश मधून कॉंग्रेस मधून भाजप मध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपकडून तिकीट देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामुळं राज्यात निवडणूका होणार नाही.