Home > News Update > मनसेचं इंजिन सुसाट! १५० जागा स्वबळावर लढणार

मनसेचं इंजिन सुसाट! १५० जागा स्वबळावर लढणार

मनसेचं इंजिन सुसाट! १५० जागा स्वबळावर लढणार
X

लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढवलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. राज्यातल्या १५० जागांवर मनसे स्वतंत्रपणे आपले उमेदवार देणार असल्याची माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिलीय.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी भाजपविरूद्ध सभा घेत राज्यभर रान उठवलं होतं. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळाला होता. या काळात त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जवळीक वाढली होती. राज यांच्याकडून राज्यात होत असलेल्या भाजपविरोधी वातावरणाचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल असं बोललं जात होतं. मात्र, लोकसभेच्या निकालात फरक जाणवला नाही.

त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे हा आघाडीत सामील होईल अशाही चर्चा रंगल्या होत्या. पण आता मनसेनं स्वबळाची तयारी केल्याचं कळतंय. मुंबईतल्या वांद्र्यामध्ये आज इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Updated : 30 Sep 2019 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top